पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने खा.नाईक निंबाळकर यांच्या खांद्यावर टाकली ही महत्वाची जबाबदारी

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी  भाजपने खा.नाईक निंबाळकर यांच्या खांद्यावर टाकली ही महत्वाची  जबाबदारी

पंढरपूर – पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने समाधान आवताडे यांना उमेदवारी जाहीर केली असून निवडणूक प्रमुख म्हणून माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जबाबदारी देण्यात आली आहे. तर उमेदवार प्रतिनिधी म्हणून उमेश परिचारक यांची निवड करण्यात आली आहे.

याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. यावेळी बाळा भेगडे , आमदार प्रशांत परिचारक, माजीमंत्री लक्ष्मण ढोबळे, समाधान आवताडे, धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शशिकांत चव्हाण उपस्थित होते.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक महाराष्ट्रातील राजकीय बदलाची नांदी ठरणार आहे. महाविकास आघाडीबाबत नाराजी असून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात भाजपाचा विजय निश्चित आहे.असे निरीक्षक बाळा भोगडे यांनी सांगितले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: