रोहित पवारांचा उदात्त’ कार्य केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना ‘साष्टांग दंडवत’


रोहित पवारांचा उदात्त’ कार्य केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना ‘साष्टांग दंडवत’

अहमदनगर : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने  दिले आहेत. दरम्यान मुंबई पोलिसांकडून हा तपास काढून CBI कड़े देण्याची मागणी करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार  यांनी इशाराच दिला आहे.

आज सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह राजपूत प्रकरणी निर्णय दिल्यानंतर रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर ट्वीट करत म्हटलं, ‘कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’ आणि राज्यातील सत्ता गमावल्यानंतर ‘मेरा अंगण मेरा रणांगण’ या घोषणेतून तर आता सुशांत सिंह प्रकरणातून भाजपाने राज्याचा नावलौकिक घालवण्याचंच काम केलं. ‘अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही.’

सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नसल्याचं न्यायालयानेच स्पष्ट केलं हे बरं झालं. पण यानिमित्ताने बिहारची राजकीय पोळी भाजण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी करण्याचं ‘उदात्त’ कार्य केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना ‘साष्टांग दंडवत’ अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: