भाजपा कार्यालयात महिला सुरक्षित नाहीत, काँग्रेसने साधला निशाणा

 

भाजपाच्या बोरिवली येथील प्रभागातील महिला नगरसेविका खेडकर यांच्या संपर्क कार्यालयात भाजपा कार्यकर्त्याने एका महिलेची छेड काढण्याचा प्रकार केला होता . मुंबईतील बोरिवलीत वॉर्ड क्रमांक १६ राम मंदिर रोड वझीरा नाका येथे अंजली खेडकर यांचे कार्यालय आहे. या कार्यरत हा प्रकार घडला असून सदर प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता याच मुद्दयावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत याबद्दल ट्विट (Tweet) करून माहिती दिली आहे की भाजपाच्या महिला विरोधी कशी भूमिका आहे या मधून दिसत आहे असं त्यांनी म्हटलं आहे ते आपली ट्विटमध्ये म्हणतात की, भाजपाच्या महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. आत्ता बोरीवली पो ठाण्यात भाजपा नगरसेविका कार्यालयात महिलेचा भाजपा कार्यकर्त्याने विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. दुर्दैव म्हणजे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी व आमदार सुनील राणे यांच्याकडे तक्रार करून न्याय मिळाला नाही.

‘इतर भाजपा नगरसेविका व नेत्यांनी तक्रार करणाऱ्या महिलेलाच मारहाण केली. ‌महिला भाजपा कार्यालयात सुरक्षित नाहीत व तीलाच छळले जाते आणि अत्याचार करणाऱ्याला पाठीशी घातले जाते. महिला विरोधी भाजपाचा जाहीर निषेध! ज्यांनी प्रकरण दाबले त्या भाजपा नेत्यांवर कारवाई झाली पाहिजे ‌’ असं ट्विट सावंत यांनी केलं आहे.

दरम्यान त्या महिलेवरती झालेल्या अन्याविरोधात बोरिवली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र बोरिवली मध्ये भाजपा नगरसेविका अंजली खेडकर यांच्या कार्यालयामध्ये महिलाचा विनयभंग झाल्यानंतर त्या महिलेनी भाजपा खासदार गोपाळ शेट्टी व आमदार सुनील राणे यांना पत्र लिहून मदत मागितली मात्र मदत मिळाली नाही उलट त्या पीडित महिला वर तीन नगरसेविका मिळून मारहाण केल्यास अशा गंभीर आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

 

Team Global News Marathi: