मतदारांची नाराजी दूर करण्यासाठी भाजप आमदाराच्या उठाबशा

ड्रॅमेबाज | मतदारांची नाराजी दूर करण्यासाठी भाजप आमदाराच्या उठाबशा

नवी दिल्ली | भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री आपल्या वादग्रस्त विधानामुळे आणि वर्तणुकीमुळे नेहमीच चर्चेत असतात अशातच आता ‘माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा… पुन्हा अशी चूक करणार नाही…’ आता मतदारसंघ आणि लोकांकडे चुकूनही दुर्लक्ष करणार नाही… हवं तर मी तुमच्या पाया पडतो… पण यावेळेस मला भरघोस मतांनी निवडून द्या… अशी केविलवाणी विनंती करीत भाजपचे आमदार भूपेश चौबे व्यासपीठावरूनच कान पकडून उठकबैठक करू लागतात!

भाजपचे आमदार भूपेश चौबे या महोदयांचा व्हिडिओ उत्तरप्रदेशात सगळीकडे व्हायरल होत आहे. एकदा निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी जनता आणि मतदारसंघाकडे दुर्लक्ष करतात. आणि निवडणूक जवळ आली की मतदारांच्या पाया पडायला सुध्दा मागे-पुढे बघत नाही, असे चित्र सध्या सर्वत्र बघायला मिळते. उत्तरप्रदेश सुध्दा यास अपवाद नाही.

सोनभद्रच्या रॉबर्टगंजहून भाजपचे आमदार भूपेश चौबे यांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. मतदारांची नाराजी दूर करण्यासाठी चौबे यांनी सभेच्या मंचावरूनच कान पकडून उठक-बैठक करायला सुरवात केली. त्यांनी लागोपाठ चारवेळा उठक-बैठक मारली. पाचव्यांदाही मारणार होते तोच व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांनी त्यांना थांबविले.

Team Global News Marathi: