भाजपा आमदार प्रसाद लाड मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला

भाजपा आमदार प्रसाद लाड मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला

ग्लोबल न्यूज: माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासही आमदार प्रसाद लाड यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

मात्र राज ठाकरेंची भेट घेण्यामागे नेमकं कारण काय आहे? ते अजून स्पष्ट झालेले नाही. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या हाताला दुखापत झाली होती, त्यामुळे प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतल्याची शक्यता आहे.

तसेच आगामी बृहमुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपा-मनसे युतीच्या दृष्टीने सुद्धा ही भेट झाल्याची दुसरी शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे यांनी आता प्रखर हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारला आहे. त्याचवेळी मराठीच्या मुद्यावरुनही त्यांच्या पक्षाची वेळोवेळी आक्रमक भूमिका असते. प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा भाजपा-मनसे युतीच्या मार्गातील अडथळा ठरु शकतो, असे राजकीय जाणकार सांगतात.

त्यामुळे युती झाली नाही, तरी मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता नाकारता येत नाही. कारण मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपा आणि मनसेसमोर प्रामुख्याने शिवसेनेचे आव्हान असणार आहे. शिवसेना आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्यावरुन शिवसेनेची कोंडी करण्याची भाजपा-मनसेची रणनिती असू शकते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: