भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर साधला निशाणा

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जेजुरी गडावर उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर शरद पवार यांच्यानंतर आता पडळकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
येणाऱ्या १६ मार्चला औंढा नागनाथ येथील अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण करणार असल्याची माहिती पडळकरांनी दिली आहे. तर, यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिल्याची चर्चा आहे.

गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्र्यांना अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी वेळ नाही. माझं कुटंब माझी जबाबदारी यातून मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. त्यामुळं सर्व समाजाच्या वतीने १६ तारखेला औंढा नागनाथ येथील अहिल्याबाईंच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहोत.’ असं ट्विट करत पळकरांनी आव्हान दिले आहे.

जेजुरी येथे उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं नियोजित वेळेच्या आधीच अनावरण करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यामुळं राज्यातील राजकारण तापले होते. पडळकरांनी केलेल्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार समाचार घेतला होता. आता पडळकरांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. आता या टीकेला शिवसैनिक कसे उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: