भाजपा नेते राम शिंदे यांचा रोहित पवारांना जोरदार धक्का !

 

राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आता हळूहळू समोर येऊ लागले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट, भाजपा विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट यांच्यात प्रतिष्ठेची लढाई आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघातील ग्रामपंचायतीचे निकाल समोर आले आहेत. त्यात रोहित पवारांना मोठा धक्का बसला आहे.

अलीकडेच राम शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतर झालेल्या त्यांच्या मतदारसंघातील ग्रामपंचायतीत राम शिंदे गटाने वर्चस्व राखलं आहे. कर्जत तालुक्यातील तिन्ही ग्रामपंचायती राम शिंदे यांच्याकडे आल्या आहेत. कोरेगाव येथे १३ पैकी ७, बजरंगवाडी येथे ७ पैकी ५, कुळधरण येथे १३ पैकी ७ जागांवर राम शिंदे गटाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. त्यामुळे या निकालाने स्थानिक आमदार रोहित पवार यांना धक्का बसला आहे.

औरंगाबाद येथील अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात असलेल्या ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने वर्चस्व राखलं आहे. याठिकाणी ३ पैकी २ ग्रामपंचायतीत शिंदे गटाची सत्ता आली आहे. नानेगाव आणि जंजाळ ग्रामपंचायतीत शिंदे गटाने विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे सातारा येथे शिंदे गटाने पहिली ग्रामपंचायत जिंकली आहे.

Team Global News Marathi: