भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यावरील मिम्सवर राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांनी दर्शवली नाराजी

 

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर बनवलेलं एक मीम्स सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यात चित्रा वाघ यांच्या आयुष्यावर टिपणी केलेली आहे. तसेच नेटकऱ्यांनी यावरून चित्रा वाघ यांना टार्गेट केले आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुठल्याही महिलेबद्दल अशा टिपणीचे समर्थन होऊच शकत नाही. अशा शब्दात मीम्स बनवणाऱ्यांना चांगलीच चपराक देत त्यांनी चित्रा वाघ यांची बाजू घेतली आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर रुपाली पाटलांचे कौतुक होताना दिसून येत आहे.

दरम्यान, चित्रा वाघ यांच्यावर बनवण्यात आलेले ते मीम्सही रुपाली पाटलांनी ट्विट केले आहे. ट्विटमध्ये रुपाली पाटील ठोंबरे लिहीतात, ‘सामाजिक जीवनात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेबद्दल अशा प्रकारे समाजमाध्यमात केलेल्या टिपणीचे समर्थन करता येणार नाही मग ती महिला कुठल्याही पक्षाची असो त्याचा निषेधच केला पाहिजे.’ असे ट्विट रुपाली पाटलांनी केले आहे.

चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर ४ लाखांची लाच मागितल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर ५ जुलाई २०१६ रोजी किशोर वाघ यांच्या घराची झडती घेतली असता करोडोंची बेनामी संपत्ती आढळून आली होती. त्यानंतर १२ जुलाईपर्यंत किशोर वाघ यांना पोलिसांनी चौकशीसाठी अटक केली होती. त्यानंतर चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपत प्रवेश केल्याने त्यांनी ही कारवाई थांबवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा आरोप होत आहे.

Team Global News Marathi: