मिलिंद नार्वेकर यांच्या तिरुपती बालाजी देवस्थान नियुक्तीवर भाजपचा सेनेला टोला !

 

देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांची यादी बुधवारी आंध्र प्रदेश सरकारने जाहीर केली असून या यादीत देशभरातून २४ व्यक्तींची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातून या यादीत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

संपूर्ण देशाबाशरत सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील तिरुपती देवस्थानाची ख्याती आहे. या देवस्थानाच्या ट्रस्ट सदस्यांच्या नियुक्तीसाठी देशभरातून मोठी चढाओढ असते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. त्यानंतर महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांची अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. मात्र या निर्युक्तीवर आता भाजपने टोला लगावला आहे.

आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून थेट सेनेला प्रश्न विचारला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, ‘तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टवर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन यांच्याकशिफारस केली होती. परप्रांतीयांवर आकस ठेवणाऱ्यांना अन्य प्रांतातील देवस्थाने आणि ट्रस्टची पदं चालतात का?’ असा सवाल भातकळकर यांनी ट्वीट करून विचारला आहे

Team Global News Marathi: