“भाजपाच्याच कंगनाबेनने बॉम्ब फोडल्याने भाजपाच्या नकली राष्ट्रवादाची गाळण उडाली”

 

मुंबई | भारताला १९४७ साली भीक मिळाली व स्वातंत्र्य २०१४ साली मिळाले, असे विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौतविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, अकाली दल, राष्ट्रीय जनता दल असे सारेच पक्ष उभे ठाकले आहेत. याच दरम्यान शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून कंगना राणौतवर जोरदार टीका करण्यात आलेली आहे.

“भाजपाच्याच कंगनाबेनने बॉम्ब फोडला असून त्यामुळे भाजपाच्या नकली राष्ट्रवादाची गाळण उडाली” असं म्हणत अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला आहे. तसेच “स्वातंत्र्य व क्रांतिकारकांच्या बलिदानाची थोडी जरी चाड असेल तर या राष्ट्रद्रोही वक्तव्याबद्दल कंगनाबेनचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले पाहिजेत” असंही सामना अग्रलेखात शिवसेना नये आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“एक आण्याची भांग घेतली तर भरपूर कल्पना सुचतात असं एकदा टिळक म्हणाले होते. कंगनाबेनच्या बाबतीत टिळकांचं विधान तंतोतंत खरे ठरते” असं म्हणत शिवसेनेने सणसणीत टोला लगावला आहे. तसेच “शिवसेनेने राष्ट्रवाद, हिंदुत्व गहाण ठेवल्याचे वक्तव्य भाजपवाले करीत असतात . महाराष्ट्रातील सत्ता गमावल्याचा तो जळफळाट असतो; पण त्यांच्या कंगनाबेनने तर भगतसिंगांपासून वीर सावरकरांपर्यंत सगळय़ांवरच अफू – गांजाच्या नशेच्या गुळण्या टाकून त्यांना भिकारी ठरवले आहे.

कंगनाबेन यांच्या मते देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ साली मिळाले. मोदींचे राज्य हेच स्वातंत्र्य. बाकी सगळे झूठ! कंगनाबेनचे डोके हे बधीर झाले आहे, असे वरुण गांधी म्हणतात. कोणत्या कारणामुळे ते बधीर झाले ते एनसीबीचे वानखेडेच शोधू शकतील! पण मोदी सरकारचे डोकेही त्याच कारणाने बधीर झाले नसेल तर या देशद्रोहाबद्दल कंगनाबेनचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार ते परत घेतील. वीरांचा, स्वातंत्र्याचा अपमान देश कधीच सहन करणार नाही” असं देखील अग्रलेखात म्हटलं आहे.

Team Global News Marathi: