चंद्रकांत पाटील यांच्या गावातच शिवसेना विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर भाजपची हात मिळवणी

चंद्रकांत पाटील यांच्या गावातच शिवसेना विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर भाजपची हात मिळवणी

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावातच काँग्रेस-राष्ट्रवादीशी भाजपने हातमिळवणी करून शिवसेना पक्षाला शह देण्यासाठी तिन्ही पक्षाचे स्थानिक नेते एकत्र आले. त्यामुळे तीन पक्षाच्या झालेल्या युतीची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरु झाली आहे.

चंद्रकांतदादा पाटील यांच्या खानापूर गावात सध्या भाजपची सत्ता आहे. मात्र शिवसेनेचे एकमेव आमदार प्रकाश आबिटकर यांना रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर भाजपने हातमिळवणी केली आहे. भुदरगड तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायतीसाठी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे स्थानिक नेते एकत्र आले.

राज्यात आघाडीची सत्ता असतानाही खानापूरमध्ये ही अनोखी युती झाली आहे. स्थानिक पातळीवर का असेना, पण शिवसेनेविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी शड्डू ठोकत चक्क भाजपशी आघाडी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. वारंवार होणाऱ्या आरोपांमुळे चंद्रकांत पाटलांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. खानापूर गावात आबिटकर गटाला रोखण्यासाठी भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ घेतली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: