सरनाईक यांच्यावर झालेल्या कारवाईत भाजपचा कोणताही हात नाही – चद्रकांत पाटील

सरनाईक यांच्यावर झालेल्या कारवाईत भाजपचा कोणताही हात नाही – चद्रकांत पाटील

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचनालयाने सकाळी धाड टाकली. आमदार सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकण्यात आला होता. तसेच त्यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विंहग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचे पथक पोहोचले होते त्यात विहंग नाईक यांना चौकशीसाठी ईडीने ताब्यात घेतले आहे. यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे.

या झालेल्या कारवाही नंतर आघाडीच्या अनेक नेत्यांकडून भारतीय जनता पक्षावर टीका होत असताना दिसत आहे. त्यात सत्ता गेल्यामुळे काहींना त्रास होतोय त्यामुळे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाही होत आहे असे वक्तव्य करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी भाजपाला चिमटा काढला होता.

यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील या मुद्द्यावर भाष्य केले आहे. ‘ईडी ही स्वतंत्र यंत्रणा आहे, त्यांच्याकडून होणाऱ्या कारवाईमध्ये केंद्राचा कोणताही हात नसतो. त्यामुळे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर जो इडीचा छापा पडला त्यात भाजपचा कोणताही हात नसल्याचा खुलासाही पाटील यांनी केला. इडीच्या कारवाईबाबत आरोप करणे म्हणजे विरोधकांना संविधान अमान्य असल्याचा आरोपही त्यांनी केला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: