“भाजपा फ्रॉड पार्टी, आम्ही चुकलो”, पश्चिम बंगालमधील भाजपा कार्यकर्त्यांनी गावभर फिरत मागितली जनतेची माफी

पश्चिम बंगाल | पश्चिमबंगाल विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी ममता बॅनर्जी यांच्या पक्षातील अनेक नेते-मंडळींनी ममतादीदी यांच्या तृणमूल पक्षाला सोडचिट्टी देऊन भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला होता. त्यातच निवडणुकीला तृणमूलने भाजपचा दणदणीत पराभव करून विजय मिळवला होता. आता पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये तृणमूल पक्षाची सत्ता स्थापन झाल्यावर भाजपात गेलेल्या नेत्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश कार्याला सुरवात केली आहे.

त्यातच आता आणखी एक प्रकरण समोर येत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे अनेक कार्यकर्ते गावभर फिरुन जनतेची माफी मागत आहेत. तृणमूल काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांनी घरवापसी केली आणि आता काही भाजपा कार्यकर्ते भाजपा फ्रॉड पक्ष आहे म्हणत लाऊडस्पीकरवरुन ओरडत, गावभर फिरत जनतेची माफी मागत आहेत. बीरभूम जिल्ह्यातल्या लाभपूर, बोलपूर, सैथिया तसंच हुगली जिल्ह्यातल्या धनियाकली या गावांमधून भाजपा कार्यकर्त्यांनी हा सार्वजनिक माफीनाम्याचा कार्यक्रम केला आहे.

या माफिनाम्यामध्ये सांगण्यात आले आहे की भाजपाने गोड बोलून गळ घातली होती पण तो पक्ष फ्रॉड आहे. आमच्याकडे ममता बॅनर्जी यांच्याशिवाय कोणताही पर्याय नाही आणि आम्ही त्यांच्या विकास कार्यक्रमाचा भाग व्हायलाच हवं. मुकूल मंडल नावाच्या एका भाजपा कार्यकर्त्याने सांगितलं की, मी भाजपाला ओळखायला चुकलो. मला तृणमूलमध्ये परत जायचं आहे. सैथियामध्ये तर भाजपाचे ३०० कार्यकर्ते शपथ घेतल्यानंतर तृणमूलमध्ये परतले आहे.

Team Global News Marathi: