भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित मधील पदाधिकाऱ्यांचा मनसेत जाहीर पक्ष प्रवेश

 

मुंबई | स्थानिक स्वराज्य निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी तथा मोर्चेबांधणी सुरु केली आहे तसेच पक्षा-पक्षांमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. एकीकडे सत्ताधाऱ्यांना जोरदार टक्कर देण्यासाठी आणि अनेक वर्ष रखडलेले जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मनसेने सुद्धा जोरदार तयारी सुरु केली आहे.

अशातच आता आज मनसेने भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र टेलिकॉम संघटनेचे अध्यक्ष सतीश नारकर यांच्या प्रामुह मार्गदर्शनाखाली आज असंख्य तरुणांनी मनसेत जाहीर प्रवेश केला. हा सत्ताधारी आणि प्रमुख विरोधी पक्षाला बसलेला जोरदार धक्का मानला जात आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: