भाजपकडून केंद्रीय एजन्सीचा दुरुपयोग, जयंत पाटलांनी साधला मोदी सरकारवर निशाणा

 

ग्लोबल न्युज मराठी | ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छाप्यानंतर इंसेबी हंडीकरी समीर वानखडे प्रकाश झोतात आले होते. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट वानखडे आणि भाजपा संबंधांचा फाडाफोड करून एकाच खळबळ उडवून दिली होती तर दुसरीकडे या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे.

पाटील म्हणाले की, केपी गोसावी यांचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी ड्रग्ज संदर्भात एनसीबीविरोधात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. हे प्रकरण पाहिले तर खूप गंभीर आहे. तिथे खरंच अंमली पदार्थ होते का? अंमली पदार्थ तिथे कसं पोहोचले? कुणी ठेवले होते का? त्यानंतर जो घटनाक्रम आहे, भाजपची माणसं आरोपींना बाहेर आणताना दिसत आहेत. त्यानंतर अशाप्रकारे पैशांची मागणी होत असेल तर या प्रकरणात बरेच लोक असल्याची शक्यता आहे. केंद्र सरकार एजन्सीचा दुरुपयोग करतेय, लोकांकडून पैसे उकळण्याचं काम सुरु आहे.

दरम्यान आज एनसीबीच्या एका पंचाचाच व्हिडीओ रविवारी समोर आला आहे. या व्हिडीओत त्या पंचाने एनसीबी आणि एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जेलमधून बाहेर सोडण्यासाठी शाहरुखकडून 25 कोटी मागण्यात आले होते. त्यातील 8 कोटी समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असा खळबळ जनक दावा व्हिडीओत करण्यात आला असल्याने याबाबत अनेक राजकीय लोकांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Team Global News Marathi: