भाजपच्या बॅनरला शिवसेनेकडून बॅनरनेच उत्तर, राणेंना लगावला जोरदार टोला

 

सिंधुदुर्ग | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यांवर केलेल्या टिपण्णीमुळे राज्यातील वातावरण चांगलचं तापू लागलं होतं. त्यातच आता पुन्हा एकदा जन आशीर्वाद यात्रा सुरु झाल्यानंतर सेना-राणे कार्यर्त्यांमध्ये बॅनरबाजी रंगलेली आहे. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता बॅनर वॉर रंगू लागले आहे.

देवगड येथे काल लावलेला बॅनर “ते असतानाही नाही, संपवू शकले, ते आता काय संपवणार “‘दादा’गिरी” या मथळ्याखाली बॅनर लागल्यानंतर आता सेनेकडूनही त्याला कणकवलीत चोख प्रत्युत्तर दिले गेले आहे. “ते राज्यात मंत्री असताना कोकणात पराभूत केले, ते केंद्रात मंत्री होऊन काय फरक पडणार” अशा आशयाचा बॅनर कणकवलीत शिवसेना जुन्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ लावण्यात आला आहे.

या बॅनरच्या वरील बाजूला स्वर्गीय बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे १९ ऑक्टोबर २०१४ रोजी “जायंट किलर” असा उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरवर निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आमदार वैभव नाईक यांना कार्यकर्त्यांनी विजयोत्सवात उचलून घेतानाच्याही फोटोचा ही समावेश आहे. तर बॅनरच्या एका बाजूला बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद देताना चा फोटो आहे. मात्र आता हा बॅनर सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.

Team Global News Marathi: