भाजपच्या विरोधात फक्त पवार आणि ठाकरे यांची बोलायचं का ? राऊत आघाडीच्या मंत्र्यांवर संतापले

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधात बसलेले भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडीवर आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर सतत टीका करताना दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे या टीकेला फक्त शरद पवार आणि मुख्यमंरी उद्धव ठाकरे हेच फक्त प्रतिउत्तर देताना दिसून येत आहे. अंतर दुसरीकडे सत्तेत असलेले मंत्री महोदय यावर भाष्य न करताना दिसून येत आहे. याच मुद्द्यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

भारतीय जनता पक्षाकडून महाविकास आघाडीच्या सरकारची जी बदनामी केली जात आहे, प्रतिमाहनन करण्याचा प्रयत्न सुरू आहे, ते रोखण्याची जबाबदारी सरकारमधील सर्व मंत्र्यांची आहे. त्यांनी आता केवळ खुर्च्यांवर बसू नये. प्रतिहल्ले करावेत,’ असं आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज केलं.

‘सरकारवर होणाऱ्या टीकेला केवळ शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे किंवा संजय राऊत यांनीच उत्तर द्यायचं का? सत्तेत बसलेल्या व सत्ता भोगणाऱ्या सर्वांची ती जबाबदारी आहे. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी आता शांत राहू नये. हल्ल्या प्रतिहल्ला आणि टोल्याला प्रतिटोला हाणावा. किंबहुना आता सर्व मंत्र्यांना बोलावंच लागेल. तसं झालं तर भाजपवाले आठ दिवसांत पळून जातील,’ असं संजय राऊत म्हणाले.

Team Global News Marathi: