वाढदिवस विशेष: ‘ दबंग ‘ अधिकारी संतोष गिरीगोसावी

वाढदिवस विशेष: ‘ दबंग ‘ अधिकारी संतोष गिरीगोसावी

निर्माता राहुल शेट्टीने पोलीस अधिकाऱ्यावर’ सिंघम ‘ चित्रपट काय बनवला आम्ही वाचाळ पत्रकार कुणालाही सिंघम म्हणू लागलो. मग त्याच्या अंगात जयकांत शिकरेचे गुण असलेत तरी…डिपार्टमेंट मधे बोटावर मोजण्या इतके काही माणसं चुकीची वागणारी नक्कीच आहेत
पण उर्वरित सगळी सिंघम च्याही पलीकडे जाऊन कर्तव्य बजावणारी आहेत.

यातील काहींना प्रकाशझोत मिळतो..बरीच दुर्लक्षित राहतात..काही कायम प्रसिद्धी साठी हपाललेले तर बऱ्याच जणांना प्रसिध्दी पासून लांब राहून काम करायला आवडते…तत्सम लाईमलाईटटाळून केवळ आपल्या कर्तव्यासाठी लढणाऱ्या दबंग अधिकारी..यांच्या विषयी आज लिहावेच म्हणून हा शब्द प्रपंच.

…सुंदर..मनमोहक तरुणी समोरून आपल्या अदेतून चालत गेली की,मोराची चाल आठवते
नयन तिचे बघता..डोळे हरिणीचे समोर येतात.तसाच एखादा तरणाबांड.. भारदस्त चालीने आला..की ती चाल वाघाची.. दिसते..शोभते.. पण ती चाल पाहिजे सेवेतल्या वर्दीतून.. वर्दीतल्या.. गर्दीतून.. गर्दीतल्या दर्दीतून..तेंव्हाच ती शोभते चाल वाघाची..या सर्व विशेषणांत अगदी फिट्ट बसणारे गुन्हेगारांवर कायद्याचा मजबूत पंजा जकडणारे.. दबंग.. ड्याशिंग.. एन्काऊंटर फेम माझे मित्र पोलीस निरीक्षक श्री संतोष गिरिगोसावी साहेब यांचा आज १ फेब्रुवारी रोजी वाढदिवसत्यानिमित्ताने त्यांना सुयश चिंतितो.साहेबांना आई भवानी उदंड निरोगी आयुष्य देवो ही तिच्या चरणी प्रार्थना करतो.

मी पत्रकारीता करत असतांना गत 25 वर्षात अनेक अधिकाऱ्यांशी माझा थेट संबंध आला.त्यात पोलीस अधिकारी हा माझा खास आवडता वर्ग(माहीत नाही का?)म्हणजे माझे अत्यंत जवळचे मित्र व डॉ.आमदार विजय कुमार गावीत यांचे पी.ए.श्री अंतू पाटील मला नेहमी पोलीस अधिकारी स्पेशालिस्ट पत्रकार म्हणून मस्करी करतात.

माझी अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी आजही मैत्री आहे.अनेक अधिकाऱ्यांशी माझे वादही झालेत.तात्विक भांडणे झालीत.मतभेद झालेत,पण मनभेद होऊ दिले नाहीत.मैत्री साठी एक पाऊल पुढे टाकला असेल तर ती टिकवण्यासाठी दोन पावलं मागे सरकायलाही मी हबकलो नाही. कधी इगो बाळगला नाही.

काही नाव सांगाविशी वाटतात.ज्यांच्याशी वादातून मैत्री झाली.अन ती वादातीत राहीली त्यात पोनि. अनिल कातकाडे संजय मोगले, डी.टी.चौधरी,डीवायएसपी समाधान पवार,मोहन मोहाडीकर, शामकांत सोमवंशी तहसीलदार डॉ संदीप आहेर मुख्याधिकारी श्री सतीश दिघे अशी खूप सारी नावांची लांबलचक यादी होऊ शकते. ज्यांना आजही मी आदराने उल्लेखतो.त्यांनीही मैत्री टिकवून ठेवली आहे.पण ज्यांच्याशी कधी भांडावेसेच वाटले नाही.अथवा वाद घालण्याचा प्रसंग उद्धभवला नाही.ते म्हणजे पोलीस निरीक्षक श्री संतोष गिरीगोसावी.

साधारण २००३-२००६ या तीन वर्षांत साहेब चोपडा शहर पो.स्टे. पोलीस उप निरीक्षक म्हणून नेमणुकीस होते. त्यावेळी इंचार्ज ए पी आय रवींद्र बुधवंत.ज्यांना आम्ही मित्र मंडळी आदराने आर.आर.आबा म्हणत. गिरीगोसावी साहेब त्यावेळ पासूनच दबंग अन ड्याशिंग होते.म्हणजे बऱ्याच वेळा प्रभारी इंचार्ज अधिकार्याचे कामच पडेना.बस्स गिरीगोसावी समोर आले की मॅटर सॉल.ड्रेस साधा असो वा वर्दी…धप धप करणारी बुलेट..कमरेच्या पाठीमागे लावलेले सर्विस रिव्हॉल्वर आणि ती एन्ट्री!सडकछाप,चोरटे भामटे अवसान गळाल्यागत लटपट करायचे. गिरीसाहेब मूळ भाम्बोरा ता.कर्जत जिल्हा अहमदनगर येथील शेतकरी कुटुंबात जन्मले.

 

कृषी पदवीधर (BSC,M,SCAgri)एल.एल.बी.,एल.एल.एम.1994 मधे MPSC उत्तीर्ण होऊन कृषी अधिकारी म्हणून श्रीगोंदा येथे रुजू झाले.त्या नंतर जेलर,अकाउंट व फायनान्स अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले.पण काही तरी वेगळे
देशसेवा-समाजाची सेवा करण्याची उर्मी गप्प बसू देईना…
अखेर 1995 मधे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कर्तव्यास आले.पोलीस खात्यात ज्यांचे नुसते नावही काढले तरी भल्या-भल्यांची फाटते असे एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नाईक,प्रदीप साळसकर यांच्या सोबत मुंबईत काम केले त्यांच्या सहवासात टेरर अधिकारी म्हणून ओळख तयार झाली.
गोरेगाव,ठाणे,सहाराविमानतळ,गुन्हेशाखा,नाशिक,गडचिरोली,पुणे,चाकण,शिक्रापूर,टेभुर्णी व सध्या बार्शीत(सोलापूर) ग्रामिण,एसआयटीत असतांना मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरण तपासात उत्कृष्ट कामगीरी करून गुन्हा उघडकीस आणला नक्षलग्रस्त गडचिरोली भागात असतांना 2014 मध्ये तीन वेळा नक्षलवादयांशी चकमक झाली.

यावेळी उल्लेखनीय काम केल्याबद्दल राज्य शासनाचे विशेष सेवापदक व केंद्र शासनाच्या आंतरिक सेवापदक,राष्ट्रपती पदकाने सन्मानित झाले होते.पुणे ग्रामीण भागात असतांना चाकण येथे आशिया खंडातील सर्वात मोठे आटोहब आहे.40 पेक्षा जास्त मल्टिनॅशनल तर 1000 पेक्षा अधिक कंपन्या आहेत.

अर्थातच आर्थिक उला ढाली आल्या की संघटीत गुन्हेगारी आलीच.या भागातत्याकाळी शाम दाभाडे याची दहशत होती.साथीदारांसह त्याला एन्काऊंटर करून संपवण्यात प्रमुख सहभाग साहेबांचा होता.शिक्रापूर जातीय दंगल,तळेगाव इंडस्ट्री भागात गुंडगिरी,दादागिरी, मोडून काढली.त्याकाळात मराठाआरक्षण मोर्चा काहीसा हिंसक वळण घेत असता ते अगदी लिलया हाताळून धैर्याने पोलीस-जनतेतला सुसंवाद घडवून आणला म्हणून तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षकश्री विश्वास नांगरे पाटील यांनी विशेष गौरव केला होता.

अशा कर्तव्य कर्मठ पोलीस अधिकाऱ्याचा आज वाढदिवस आहे.साहेब चोपडा असताना त्यांनी मैत्रीचे मोठे जाळे शहरात विणले होते.आजही गिरीगोसावी साहेब असतील बुधवंत साहेब असतील सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्वाशी जुडलेले आहेत माझे तर बऱ्याच वेळा फोनवर बोलणे देखील होत असते.असे अनेकांचे होतही असेल फोनवर संवाद होत असतांना हे दोनही अधिकारी आपल्या चोपडा शहराची मित्र-मंडळींची नाव घेऊन आस्थेवाईकपणे विचारपूस करतात त्यांच्या बोलण्यात प्रेमाचा ओलावा जाणवतो.

गिरीगोसावी साहेब सध्या बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम करत आहेत. तिथेही आपल्या कामगिरीने ते वलयांकित आहेतच…

अधिकारी आपल्या शहरात पोस्टिंगला असला की सारेच वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करायला चढाओढ करतात.पण खरे प्रेम तर अधोकारी बदलून गेल्यावर शुभेच्छा देण्यात असते.मी पत्रकार म्हणून लिखाण करतांना अनेक विषय हाताळतो त्यात काही सस्पेन्स,काही वादग्रस्त,काही सामाजिक काही धार्मिक काही राजकीय असे विविधांगी विषय हाताळतो आजचे शब्द हे केवळ अन केवळ प्रेम-स्नेह यावर गुंफलेले आहेत.श्री संतोष गिरीगोसावी साहेब यांना उदंड आयुष्यासाठी पुनश्च शुभेच्छा व वाढ दिवसाच्या शब्दरूपी शुभेच्छा..

श्री गिरीगोसावी यांचा मो.न.
9823858100
जहां जायेगा अपनी रोशनी बिखेरेगा
किसीं चिराग का अपना घर नही होता!
*शाम जाधव* (पत्रकार)
अध्यक्ष-प्रेरणा दर्पण फाऊंडेशन,चोपडा
9822325717 ; 9834634935

ग्लोबल न्युज नेटवर्क: