Tuesday, June 6, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात घडणार मोठी उलथापालथ? मोदींची सूचक वक्तव्य महाआघाडीच्या थेट वर्मावर

by ग्लोबल न्युज नेटवर्क
March 11, 2022
in राजकारण
0
महाराष्ट्रात घडणार मोठी उलथापालथ? मोदींची सूचक वक्तव्य महाआघाडीच्या थेट वर्मावर

महाराष्ट्रात घडणार मोठी उलथापालथ? मोदींची सूचक वक्तव्य महाआघाडीच्या थेट वर्मावर

 

मोदींच्या उत्तर प्रदेश आणि इतर तीन राज्यातल्या विजयानंतरच्या भाषणात भाजपच्या हातातून येता येता राहिलेलं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे रोख होता. त्यांच्या भाषणातली अनेक विधानं थेट नव्हती पण सूचक होती आणि त्यांचा नेम थेट महाराष्ट्रातल्या महाआघाडी सरकारच्या वर्मावर होता.

मोदींच्या उत्तर प्रदेश आणि इतर तीन राज्यातल्या विजयानंतरच्या भाषणात भाजपच्या हातातून येता येता राहिलेलं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे रोख होता. त्यांच्या भाषणातली अनेक विधानं थेट नव्हती पण सूचक होती आणि त्यांचा नेम थेट महाराष्ट्रातल्या महाआघाडी सरकारच्या वर्मावर होता.

दिल्ली, 10 मार्च: सलग दुसऱ्या वेळी मोठ्या बहुमताने निवडून येत उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाने इतिहास घडवला आहे. मोदी-योगी डबल इंजिनचा हा विजय असल्याचं उघड बोललं जात असलं तरी कमजोर विरोधी पक्षसुद्धा कारण असल्याचं विरोधक सांगतात. मोदींच्या दिग्विजयाचा रथ 2022 मध्येही दौडत आहे आणि त्यात काँग्रेससारखा विरोधक सपशेल चिरडला गेला असल्याचं चित्र आहे.

मोदींच्या उत्तर प्रदेश आणि इतर तीन राज्यातल्या विजयानंतरच्या भाषणात मात्र एक वेगळा सूरही दिसला. भाजपच्या हातातून येता येता राहिलेलं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे त्याचा रोख होता. त्यांच्या भाषणातली अनेक विधानं थेट नव्हती पण सूचक होती आणि त्यांचा नेम थेट महाराष्ट्रातल्या महाआघाडी सरकारच्या वर्मावर होता.

महाराष्ट्रात भाजपविरोधात सगळेच पक्ष एकवटल्याने भाजप सत्तेपासून दूर राहिला. महाविकासआघाडीचं सरकार कितपत टिकेल असं वाटत असतानाच 2022 साल उजाडलं. पण महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांविरुद्ध सध्या भ्रष्टाचाराच्या चौकशा  सुरू आहेत. IT, ED यांनी सरकारमधल्या विशेषतः राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना लक्ष्य केलेलं असतानाच मोदींच्या भाषणात सूचक विधानं आली. ती बरोबर महाराष्ट्र सरकारच्या वर्मावर बोट ठेवणारी आहेत.

 

 

मोदींच्या विजयोत्सवाच्या भाषणात वास्तविक भ्रष्टाचाराचा आणि सेंट्रल एजन्सीचा मुद्दा येणं सहाजित नव्हतं. पण तरी मोदी बराच वेळ यावर बोलले. मोदी म्हणाले, “जनता भ्रष्टाचाराला कंटाळली आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांचाही  तिटकारा आला आहे. यापुढे कुठल्याही दबावाला न झुकता भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल. ”

मोदींची ही विधानं कुणासाठी?

स्वतः घोटाळे करणारे लोक चौकशी सुरू झाली की तपास यंत्रणांवर दबाव आणतात.

केंद्रीय संस्थांवर घोटाळेबाजच अविश्वास दाखवतात. त्यांचा न्यायपालिकेवरही विश्वास राहिलेला नाही.

आधी हजारो करोड रुपयांचा भ्रष्टाचार करायचा आणि त्याचा तपासही होऊ नये यासाठी दबाव आणायचा, असं या घोटाळेबाजांचं काम आहे.

अशा भ्रष्टाचाऱ्यांचीस, त्यांच्या गैरव्यवहारांची चौकशी सुरू झाली की ते धर्म, जात, प्रांत असा रंग देऊन वेगळीकडेच लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात.

अशा दबावाला आता बळी पडणार नाही. भ्रष्टाचाराविरोधात चौकशी करणाऱ्या एजन्सीवर दबाव आणला तरी कडक कारवाई सुरूच राहणार.

लोकांचा विश्वास आहे की, भ्रष्टाचाराविरोधात आणि घोटाळेबाजांविरोधात कारवाई करण्याची धमक फक्त भाजप या एकाच पक्षात आहे.

घोटाळ्यात अडकलेले सगळे लोक एक होतात आणि चौकशी यंत्रणांवरच अविश्वास दाखवता

शरद पवार यांनीदेखील महाआघाडी सरकार कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण आमचं सरकार मजबूत आहे, असं विधान केलं होतं. फडणवीस यांनी विधानसभेत उघड केलेल्या पेन ड्राइव्ह बाँबमागेही सेंट्रल एजन्सीजच्या हात असल्याचं विधान शरद पवार यांनी बुधवारीच केलं होतं. मोदींनी त्यांच्या भाषणात सेंट्रल एजन्सीवर अविश्वास दाखवणाऱ्यांचा उल्लेख नाव न घेता केला.

UP Election 2022: कोण म्हणतं BJP ला मुस्लिमांची मतं मिळत नाहीत? जाणून घ्या मुस्लीमबहुल भागातील स्थिती

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी काही तारखा घोषित करून या तारखांना बॉम्ब पडेल, असं विधान केलं होतं. त्यामध्ये 11 मार्च ही तारीख होती. ‘मी ज्या ज्या तारखांना बॉम्ब पडणार असं सांगितलं होतं, ते ते घडत गेलं आहे. आता 11 तारखेला काय होतं ते पाहूया’, असं पाटील आज पुन्हा म्हणाले.

‘संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी आवरले पाहिजे. कारण राऊत लोकसत्तेत जातील उद्या तरूण भारतमध्ये येतील. पण उद्धव ठाकरे आणि आदित्य यांना भविष्य आहे. त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे, असा सल्लावजा टोला पाटील यांनी लगावला.

फडणवीस यांनी निवडणूक निकालानंतर बोलताना महाराष्ट्रातही उलथापालथ होईल असं सूचक विधान केलं होतं. महाराष्ट्रात झालेल्या चुका इतर ठिकाणी करणार नाही, असं ते म्हणाले. या सगळ्याचा एकत्र विचार करताना आणि गाळलेल्या जागा भरताना असंच दिसतं की मोठी राजकीय उलथापालथ पुढील काही दिवसात महाराष्ट्रात घडू शकते.

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: नरेंद मोदीमहाराष्ट्र सरकार
ADVERTISEMENT
Next Post
अमिबालाही लाज वाटेल अशी शिवसेना.. आशिष शेलारांचा सेनेला टोला

गोरेगाव बदलू शकले नाही ते गोरखपूर काय बदलणार? भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार

Recent Posts

  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • पंडित नेहरू नंतर नरेंद मोदींच्या हातात येणार राजदंड
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • युवकांचे आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक….
  • राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group