बिग बॉस मराठी भाषेचा अपमान, कलर्स वाहिनीने मागितली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे माफी

बिग बॉस मराठी भाषेचा अपमान, कलर्स वाहिनीने मागितली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे माफी

बिग बॉस कार्यक्रमात मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या गायक जान कुमार सानू विरोधात शिवसेना पक्षाने आक्रमक भूमिका घेतली होती. या संदर्भात युवासेना सचिव वरून सरदेसाई यांनी ट्विट करत इशारा वजा समज दिली आहे. यानंतर बिग बॉस कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या कलर्स वाहिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. तसंच दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आहे.

बिग बॉसच्या १४ व्या हंगामात गायक जान कुमार सानू आणि निकी तांबोळी यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी निकी तांबोळी मराठीत बोलली होती. त्यावरून जानने राग व्यक्त केला होता. मला मराठी भाषेची चीड येते असे त्यांनी म्हंटले होते. यावरून शिवसेनेने त्याची कार्यक्रमातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. यानंतर कलर्सने पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितलेली आहे.

काय ट्विट केले होते युवासेना सचिव वरून सरदेसाई यांनी

महाराष्ट्रात राहून मराठी द्वेष?? बिग बॉस कार्यक्रम चालतो महाराष्ट्रात आणि असली विधानं करायची ह्यांची हिम्मत होते कशी ?, असा सवाल त्यांनी विचारला आहे. बिग बॉसच्या व्यवस्थापनाने व ह्या व्यक्तीने महाराष्ट्राची व मराठी जनतेची त्वरित माफी मागावी अन्यथा त्यांना रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: