शेतमजूरी करणाऱ्या आई-वडिलांचं पोरग झालं मोठा ‘साहेब’ , UPSC परीक्षेत देशात 8 वा

वैराग : मुलाला ऑफिसर बनवण्यासाठी आई-वडिलांनी मजुरीची कामे सोडली नाहीत. मुलांना उच्चशिक्षित केले. पण बारावीपर्यंत गावात आईबरोबर डोक्‍यावर पाटीत भाजी ठेवून विकणाऱ्या मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले आहे. आणि देशात आठव्या क्रमांकाने तो उतीर्ण होत असिस्टंट कमांडंट या पदावर आपले नाव कोरले आहे.

शरण गोपीनाथ कांबळे (रा. तडवळे, ता. बार्शी) असे या युवकाचे नाव आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ऑगस्ट 2019 मध्ये घेण्यात आलेल्या सीएपीएस असिस्टंट कमांडंट (ग्रुप ए) परीक्षेमध्ये देशात आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.

कांबळे कुटुंबीयांना दीड एकर शेती आहे. दोन मुले असणारे कांबळे दांपत्य काबाडकष्ट करते. थोरला मुलगा दादासाहेब इंजिनिअर झाला, तर लहान मुलगा शरण हा अभियंता पदाची पदवी घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण यशवंतराव चव्हाण प्रशाला तडवळे, बारावीचे शिक्षण विद्या मंदिर वैराग तर वालचंद कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज सांगली येथे 2016 मध्ये बी टेक झाला.

पुढील शिक्षणासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळूरमधून 2018 मध्ये मास्टर ऑफ टेक्‍नॉलॉजीची पदवी पूर्ण केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कंपनीने वीस लाखांचे पॅकेज देऊ केले होते, पण शरणने ते पॅकेज नाकारले. कारण, आई सुदामती व वडील गोपीनाथ यांच्या मजुरीचे पांग फेडण्यासाठी त्याने सोळा ते आठरा तास अभ्यासाची मेहनत घेतली. पुढे त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचे ठरविले.

शरणने ऑगस्ट २०१९मध्ये पहिल्यांदाच केंद्रीय लोकसेवा आयोगाचीपरीक्षा दिली आणि ते देशात आठव्या क्रमांकांने उत्तीर्ण झाले सेंट्रल आम्र्ड पोलीस फोर्सद्वारे विविध दलामध्ये भरती केली जाते शरण हा सीएपीएफ असिस्टंट कमांडंट परीक्षेमध्ये पाहिल्याच प्रयत्नात देशात आठवा आला आहे या परीक्षेमध्ये पास झालेल्या उमेदवारांची बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF, सेंट्रल रिर्झव्ह पोलीस फोर्स CRPF, सेंट्रल इंडी स्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स CISF, इंडो -तिबेटीयन बॉर्डर पोलीस IT BP, सशस्त्र सीमा बल SSB या दलामध्ये निवड केली जाते.

 

शरण कांबळेचे आईवडील मोलमजूरी करतात, मुलगा हुशार असल्यामूळे त्यांनी रक्ताचे पाणी करून मुलाला क्लास वन बनविले शरण कांबळे उर्तीर्ण झाल्याचे कळताच गावात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली गावातील अनेकांनी शरण कांबळेचे अभिनंदन केले आहे

 

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: