मोठी बातमी : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली  : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. उपराष्ट्रपती नायडू यांची प्रकृती स्थिर असून ते होम क्वारंटाईन आहेत.

व्यंकय्या नायडू यांची पत्नी उषा नायडू यांची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आली असून त्या सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत, अशी माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.

मंगळवारी सकाळी त्यांची चाचणी करण्यात आली होती. दरम्यान, नायडू यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसून त्यांची प्रकृती चांगली आहे, असे उपराष्ट्रपती कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: