मोठी बातमी | भारताच्या Covaxin आणि Covishield ला ११० देशांची परवानगी !

 

संपूर्ण जगभरात कोरोनाच्या संसर्गाने हाहाकार माजवला असून या संसर्गावर मात करण्यासाठी संपूर्ण जगभरात लसीकरणावर भर देण्यात येत आहे. तसेच कोरोनाविरोधात लढण्यासाठी सध्यातरी लसीकरण हा एकमेव उपाय असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे सर्वच देश लसीकरण मोहित वेगाने सुरु ठेवत सर्वाधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण करत आहे.

यातच अनेक लस उत्पादक कंपन्यांकडून परदेशात लसींचा उत्पन्न पोहचण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अशातच जगभरातील तब्बल ११० देशांनी आता भारतीय बनावटीच्या Covaxin आणि Covishield ला परवानगी दिला आहे. भारत बायोटेक कंपनीमार्फत कोवॅक्सीन तर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून कोव्हिशील्ड या लसीची निर्मिती होते.

एका सरकारी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, आत्तापर्यंत ११० देशांनी Covishield आणि Covaccine या कोरोनाविरोधी लसींना मान्यता दिली आहे. भारतीय बनावटीच्या Covaxin आणि Covishield लसीला उर्वरित देशांमध्येही मान्यता मिळावी यासाठी केंद्र सरकार तयारी करत आहे. ज्यामुळे शिक्षण, व्यवसाय आणि पर्यटन अशा अनेक कारणांसाठी परदेशात प्रवास करणे सोपे होईल. अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. मात्र लवकरचं भारताच्या Covaxin आणि Covishield इतर देशांमध्येही मान्यता मिळू शकते.

Team Global News Marathi: