बीड जिल्ह्याचे नेते विनायक मेटे यांच्या अपघातीची बातमी ताजी असतानाच, बीडच्या पाटोदा-मांजरसुभा रोडवरील पाटोदया जवळ भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. स्विफ्ट कार आणि टेम्पोचा झालेला हा अपघात एवढा भीषण होता की 6 जणांचा यात मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडच्या पाटोदा -मांजरसुभा रोडवरील पाटोदया जवळ बामदळे वस्ती येथे स्विफ्ट डिझायर कार-आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला.
या अपघातात तब्बल सहा जण जागीच ठार झाल्याचे दिसून येतो. घटनास्थळी पाटोदा पोलीस व सामाजिक कार्यकर्ते दाखल होऊन अपघातातील व्यक्तींना बाहेर काढण्यात आले आहे.