मोठी बातमी | दिशा सालियन मृत्यू प्रकरणात राणे पिता-पुत्रांना अटकपूर्व जामीन मंजूर

 

मुंबई | दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पूत्र भाजपा आमदार नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात दिशा सालियन हिच्या आणि राणे पिता-पुत्रविरोधात मुंबईत गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हा दाखल होताच राणे पिता-पुत्रांनी दिंडोशी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. यातून राणे पिता-पुत्रांना दिलासा मिळाला आहे.

 

या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी करताना न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे.अटकपूर्व जामीन मंजूर होताच आमदार नितेश राणे यांनी म्हटलं, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मला.. आम्हाला दोघांनाही दिशा सालियनच्या प्रकरणात आम्हाला अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. हा जामीन काही अटी-शर्थींसह आहे.

पुढे बोलताना राणे म्हणाले की, अद्याप अंतिम ऑर्डर हातात मिळालेली नाहीये पण अटी शर्थी टाकण्यात आल्या आहेत. मी न्यायालयाचे आभार मानतो की त्यांनी लोकशाहीत आम्हा लोकप्रतिनिधींना दिलेले अधिकार आहेत, कुणावरही अन्याय होत असेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवणं हा आम्हाला अधिकार मिळाला आहे त्या अधिकाराला अबाधित ठेवण्याचं काम आज न्यायालयाने केलं आहे.

तर नितेश राणे यांनी पुढे म्हटलं, या महाविकास आघाडी सरकारने जे काही षडयंत्र आमच्या विरोधात रचलं, जो काही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला. दिशा सालियनच्या आई-वडिलांवर दबाव आणल्याचं आम्ही ऐकत आहोत.पण आता न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. यापुढेही जिथे-जिथे अन्याय होत असेल तिथे आवाज उठवण्याचं काम आम्ही करणार आहोत.

Team Global News Marathi: