Big Breaking ! राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण

मुंबई । राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. वाढती रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनला आहे. कोरोना या भयावर विषाणूनं राज्यात सुमारे 13 लाखांपेक्षा जास्त जणांना ग्रासलं आहे. अगदी सर्वसामान्यापासून राजकीय नेत्यांपर्यत कोरोनाची लागण होण्याचं सत्र सुरूच आहे. नुकतचं महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे.

गेल्या काही दिवसांपासून, त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याचं जाणवत होतं. त्यानंतर त्यांनी आपली कोरोना चाचणी केली असता, त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सध्या संजय कुमार हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम क्वॉरंटाईन झाले आहे.

दरम्यान, काही वेळापुर्वीच काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. एच.के.पाटील हे मागील आठवड्यात मुंबईला बैठकीला गेले होते. त्याबैठकीत बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वड्डेटीवार, अमित देशमुख यांच्यासह अनेक जण बैठकीला उपस्थित होते.

मुंबईवरून परतल्यानंतर त्यांना अस्वस्थ जाणवत होते. त्यांनंतर त्यांनी आपली कोरोनाची चाचणी केली असता, त्यात ते पॉझिटिव्ह आले आहे. संपर्कात आलेल्या प्रत्येकांनी आपली कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान याआधी धनंजय मुंडे, अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती.

ग्लोबल न्युज नेटवर्क: