बिग ब्रेकींग : राज्यातील नगरपरिषदेच्या निवडणुका स्थगित ; निवडणूक आयोगाचे तातडीचे पत्र –
मोठी ब्रेकींग : राज्यातील नगरपरिषदेच्या निवडणुका स्थगित ; निवडणूक आयोगाचे तातडीचे पत्र
सोलापूर : राज्यातील ९२ नगर परिषद व ४ नगरपंचायतच्या जाहीर झालेल्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी स्थगित केल्या आहेत.
राज्य सरकारने ओबीसी आरक्षण संदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केल्याने त्या आरक्षण याचिकेवर मंगळवारी दुपारी सुनावणी झाली आणि सर्वोच्च न्यायालयाने पुढील आठवड्यात यावर निकाल देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने गुरूवारी दुपारी आदेश काढून नगरपरिषदेच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत. मंगळवारीच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण सोबत आयोगाने स्थगित केली होती. दरम्यान आपल्या आदेशात निवडणूक आयोगाने काय म्हटले आहे हे पाहू …
राज्य निवडणूक आयोगाचे दि. ०८ जुलै २०२२ रोजीच्या पत्रान्वये १७ जिल्ह्यातील ९२ नगरपरिषदा व ४ नगरपंचायतींच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम २०२२ दिला होता.
मा. सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्रमांक १९७५६/२०२१ ची सुनावणी दि. १२ जुलै, २०२२ रोजी झाली. त्यावेळी शासनाने समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागासप्रवर्गाबाबत दिलेला
अहवाल मा. सर्वोच्च न्यायालयात सादर केला. मा. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील पुढील सुनावणी दि. १९/०७/२०२२ रोजी ठेवलेली आहे.
सदर पार्श्वभूमीच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, आयोगाचे दि. ०८ जुलै २०२२ रोजीच्या आदेशान्वये देण्यात आलेला राज्यातील ९२ नगरपरिषदा व ४ नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम २०२२ याद्वारे स्थगित करण्यात येत आहे. सदर निवडणूकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल. या बाबीस आपल्या स्तरावरून योग्य ती प्रसिध्दी देण्यात यावी. निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे वरील सर्व क्षेत्रात जाहीर करण्यात आलेली आचार संहिता आता लागू राहणार नाही.
मा. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार