Big Breaking: अखेर एकनाथ खडसेंनी भाजप सोडले, शुक्रवारी करणार राष्ट्रवादी मध्ये प्रवेश

गेल्या अनेक महिन्यापासून सुरू असलेली एकनाथ खडसेंच्या पक्ष प्रवेशाची चर्चा एकदाची थांबली आहे.भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (२३ ऑक्टोबर) शुक्रवारी दुपारी २ वाजता प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयात पत्रकार परिषदेत दिली.



पाहा जयंत पाटील नेमकं काय म्हणाले:

‘आज एकनाथ खडसे यांनी फोन करून भाजप पक्षाचा राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादीत आम्ही स्वागत करत आहोत. शुक्रवारी दुपारी २ वाजता एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.’ असं जयंत पाटील म्हणाले. 

गेले कित्येक दिवस भाजपचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती ती चर्चा आज संपुष्टात आली असून आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले. आता फक्त त्यांनाच प्रवेश दिला जाणार असून त्यांचे समर्थक येण्यास इच्छूक आहेत त्यांनाही काही दिवसात प्रवेश दिला जाईल. असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले

ग्लोबल न्युज नेटवर्क: