Big Breaking! राज्यात दिवसा जमावबंदी, रात्री नाईट कर्फ्यू; ठाकरे सरकारचा निर्णय जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद

Big Breaking! राज्यात दिवसा जमावबंदी, रात्री नाईट कर्फ्यू; ठाकरे सरकारचा निर्णय जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद

मागील काही दिवसांपासून कोरोनाचे (Coronavirus) रूग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागणार का याबाबत चर्चा होत होत्या. आता राज्य सरकारने (Maharashtra Government) राज्यात कठोर निर्बंध लागू केले असल्याची माहिती मिळत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तुटावी यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. रविवार (9 जानेवारी) रोजी मध्यरात्रीपासून नियमावली लागू करण्यात आली आहे. रात्री 11 वाजल्यापासून पहाटे 5 पर्यंत संचारबंदी (नाईट कर्फ्यू) Night Curfew लागू करण्यात आली आहे. यामुळे रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत अत्यावश्यक सेवा, काम वगळता बाहेर फिरता (Maharashtra Mini Lockdown) येणार नाही.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी अधिकाऱ्यांनी याबाबत पाठवलेल्या अहवालानंतर हा निर्णय घेतला आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अखेर नाईट कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत राज्यात नाईट कर्फ्यू म्हणजेच संचारबंदी असणार आहे. (Restrictions in Maharashtra)

 

काय आहे नवी नियमावली –

 

– उद्या मध्य रात्रीपासून राज्यात कडक निर्बंध असणार.

– रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत राज्यात सर्वत्र संचारबंदी. (नाईट कर्फ्यू)

 

– राज्यात आता दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसा 5 पेक्षा अधीक लोकांना एकत्र येता येणार नाही.

 

– रात्री फक्त अत्यावश्यक सेवा सुरू रहाणार.

 

– 50 टक्के नाट्यगृह, सीनेमागृह

 

– राज्यातील हाँटेल आणि रेस्टॉरंट रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत बंद. दिवसा 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार.

 

– बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात येणा-यांना 72 तास आधीचा RTPCR चाचणी बंधणकारक असणार.

 

– जिम, स्पा आणि स्विमींग पूलही पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.

 

– खासगी कार्यालये, हॉटेल्स, नाटयगृह, थिएटर्स आणि सलून्स 50 टक्के क्षमतेने चालू राहणार आहेत.

 

– मॉल्स सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेदरम्यानच सुरू ठेवता येणार आहेत.

 

– मैदाने, उद्याने आणि पर्यटनस्थळे देखील पूर्णपणे बंद राहणार आहेत.

 

– मुंबई लोकल ट्रेनवर सध्यातरी कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाहीत.

 

– अंत्यविधीला 20 जणांना उपस्थित राहता येणार तर विवाह सोहळयास फक्त 50 जण

ग्लोबल न्युज नेटवर्क: