भूपेंद्र पटेल यांचा आज दुपारी २.२० वाजता शपधविधी, शाह-शिवराज हजेरी लावणार !

 

गुजरात | विजय रुपाणी यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या जागी भूपेंद्र पटेल यांची वर्णी लागणी होती. गुजरातचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आज (सोमवार) दुपारी २.२० वाजता शपथ घेणार आहेत. यानंतर दोन दिवसांनी कॅबिनेट मंत्र्यांनाही शपथ दिली जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वतः या शपथविधीचा एक भाग असणार आहेत.

आज दुपारी केंद्रीय मंत्री अमित शहा १२.३० वाजता अहमदाबादला पोहोचतील. त्यांच्याशिवाय मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानही या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली आहे. भाजप नेते विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. मुख्यमंत्रिपदाचा कारभार नेमका कोणाकडे सोपवला जाईल हे ताडण्यासाठी राजकीय जाणकारांकडून अनेक तर्कवितर्क लावले जात होते.

मात्र या सर्व चर्चाना काही तासातच ब्रेक लागला होता या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्याची निवड करण्यासाठी भाजपच्या विधिमंडळ सदस्यांची आज बैठक झाली. या बैठकीत भूपेंद्र पटेल यांच्या नावावर एकमत झालं. आता पटेल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्याच मतदारसंघातून भूपेंद्र पटेल हे विक्रमी मतांनी निवडूण आले होते .

 

गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपानं पटेल मुख्यमंत्री दिलेला आहे. हार्दीक पटेलच्या नेतृत्वात पाटीदार समाजानं आंदोलन केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना हटवून रुपाणींना मुख्यमंत्री केलं होतं. त्यावेळेसही पुन्हा पाटीदारच मुख्यमंत्री केला जाईल अशी चर्चा होती पण केलं रुपाणींना. ते जैन समाजातून येतात. आता त्यांना हटवून पुन्हा पाटीदार समाजाचा मुख्यमंत्री करण्यात आला आहे.

Team Global News Marathi: