भूमिअभिलेख उपअधीक्षकाला लाच घेताना रंगेहात अटक

 

यवतमाळ मध्ये उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयातील भ्रष्ट कारभाराने सर्वच जण त्रस्त होते. पैसे देवूनही काम वेळेत केले जात नव्हते. बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास एसीबीच्या पथकाने उपअधीक्षकाला कक्षातच दहा हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. या कारवाईनंतर त्रस्त झालेल्या नागरिकांनी परिसरात पेढे वाटून आनंद व्यक्त केला. याची आता संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा सुरु झाली.

विजय लालसिंग राठोड (५५) असे अटक करण्यात आलेल्या उपअधीक्षकाचे नाव आहे. अमरावती एसीबीच्या पथकाने सापळा रचला होता. एसीबीच्या समक्षच कार्यालयात दहा हजारांची लाच आरोपी राठोड यांनी स्वीकारली. त्यानंतर त्यांना तत्काळ अटक करण्यात आली. चौकशीसाठी आरोपीला घेवून विश्रामगृहावर नेण्यात आले. या प्रकरणात गुन्हा नोंद झालेला नाही. एसीबीने कारवाईनंतर पुढील चौकशी सुरू केली आहे.

आरोपी विजय राठोड याने तक्रारदाराच्या जावयाचे नाव मिळकत पत्रिकेमध्ये समाविष्ट करण्यासाठी (फेरफार घेण्यासाठी) लाचेची मागणी केली होती. याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली. एसीबीच्या पथकाने या तक्रारीची १८ एप्रिल रोजी पडताळणी केली. त्यानंतर गुरुवारी २६ एप्रिल रोजी सापळा रचण्यात आला. एसीबीच्या पथका समक्षच विजय राठोड याने दहा हजारांची लाच स्वीकारली. या प्रकरणी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Team Global News Marathi: