भोजपुरी सिनेअभिनेते सुदीप पांडे आणि दीपा पांडे राष्ट्रवादीत
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत भोजपुरी सिनेअभिनेते सुदीप पांडे आणि दीपा पांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.