भोंग्यांमधून वाढलेल्या किंमतींवर…, आदित्य ठाकरेंनी साधला मनसेवर निशाणा

 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिदींवर वाजणारे भोंगे आणि हनुमान चालीसा यावरून मोठं राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. मशिदींवरील भोंगे बंद न झाल्यास त्यासमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा वाजवावी असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढी पाडवा मेळाव्यामध्ये केलं होतं. यावरुन राष्ट्रवादी सह सर्वच विरोधकांनी मनसेवर जोरदार निशाणा साधला होता तर भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला होता.

त्यानंतर ठाण्यात झालेल्या उत्तर सभेमध्ये देखील राज ठाकरेंनी या भूमिकेचा पुनरुच्चार करत राज्य सरकारला सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. यासंदर्भात राज्यातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना त्यावरून आता शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपले काका राज ठाकरेंना नाव न घेता अप्रत्यक्षपणे खोचक टोला लगावला आहे. गोरेगाव मुलुंड जोडरस्ता प्रकल्प उड्डाण पुलाचे भूमिपूजन झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

मशिदींवरील भोंग्यांचा त्रास संपूर्ण देशाला होत आहे. येत्या ३ मे रोजी ईद आहे. या तारखेपर्यंत सरकारने मौलवींशी चर्चा करून भोंगे उतरवावेत, अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालिसा लावूच”, असा निर्वाणीचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी राज्य सरकारला दिला.

Team Global News Marathi: