भाजपची पहिली यादी जाहीर! हार्दिक पटेल, रवींद्र जडेजाच्या पत्नीला तिकीट

 

गुजरातमध्ये होणाऱ्या आगामी दोन टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिल्या टप्प्यासाठी 160 उमेदवारांची नावे जाहीर केली. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल अहमदाबादमधील घाटलोडिया मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले पाटीदार नेते हार्दिक पटेल यांना विरमगाम विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

तसेच भाजपने जामनगर उत्तरमधून क्रिकेटर रवींद्र जाडेजाच्या पत्नी रिवाबा यांना तिकीट दिले आहे. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी मजुरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले पाटीदार नेते हार्दिक पटेल यांना तिकीट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पटेल यांना विरमगाम विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.

भाजपने गुजरातमधील 69 विद्यमान आमदारांची तिकिटे परत केली, म्हणजेच त्यांना पुन्हा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. त्याचबरोबर 38 आमदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. एकूण 160 उमेदवारांपैकी 38 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, नितीन पटेल, भूपेंद्र सिंह चुडासामा, आरसी फल्दू, प्रदीपसिंह जडेजा, सौरभ पटेल यांनी स्वत: पत्र लिहून भाजप अध्यक्षांना निवडणूक लढवू नका आणि पक्षासाठी काम करत राहण्यास सांगितले आहे.

Team Global News Marathi: