भाजपाची मोठी खेळी | या मराठी व्यक्तीच्या खांद्यावर उत्तरप्रदेशाची जबाबदारी

 

मागच्या दिवसांपासून दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू होती ही बैठक आता संपली आहे. यानंतर पक्षाने अनेक राज्यांमध्ये पक्ष संघटनेत बदल करण्याची तयारीही केली आहे. यूपी भाजपच्या राज्य प्रभारीपदासाठी गुजरातच्या एका तगड्या नेत्याच्या नावाची पक्षात चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्ष लवकरच याची घोषणा करू शकतो. याचबरोबर महाराष्ट्राच्या नेत्यांनाही मोठी संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

समो आलेल्या माहितीनुसार, भाजपकडून चंद्रकांत पाटील यांना यूपी भाजपचे प्रभारी बनवण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटील यांच्या नावावर हायकमांडने शिक्कामोर्तब केले आहे. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांना गुजरात विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठ्या विजयाचे बक्षीस मिळण्याची शक्यता आहे.

याशिवाय, यूपीमधील योगी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री असलेले दिनेश शर्मा यांनाही पक्ष राष्ट्रीय संघात समाविष्ट करू शकतो. या नेत्यांचा दर्जाही वाढणार आहे. याशिवाय योगी सरकारच्या पहिल्या टप्प्यातील मंत्री म्हणून काम केलेले सध्या मथुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीकांत शर्मा यांनाही राष्ट्रीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

Team Global News Marathi: