भाजपा अन् मनसेच्या युतीबाबत शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा

 

मागच्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील भेटीचा सिलसिला वाढला असून मनसे-भाजपा युतीच्या जोरदार चर्चा आता सुरु झाल्या आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटींना महत्त्व आले आहे. मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेतली. या भेटीमागचे कारण कळू शकले नाही. मात्र, या भेटींमुळे भाजपा-मनसे युतीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

मुंबई मनपा निवडणुकीत मनसेबरोबर यावी, अशी भाजपच्या नेत्यांची इच्छा असल्याचे समजते. मात्र याचदरम्यान शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी भाजपा आणि मनसेच्या युतीबाबत मोठा दावा केला आहे. भाजपा आणि मनसेला युती करण्याची गजर नाही, कारण आधीच दोघांची छुपी युती झाली आहे. त्याला सामना करण्याची ताकदही शिवसेनेत आहे.

मनसे ज्यांच्यासाठी भोंगा वाजवत होते, त्यांना आता मनसेची गरज लागत नाहीय. त्यामुळे विनोद तावडे, आशिष शेलार हे राज ठाकरेंच्या घरी जात असतात, असा गौप्यस्फोट सचिन अहिर यांनी केला आहे. राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती.

या दीड महिन्यात राज आणि आगामी फडणवीस यांची ही दुसरी भेट आहे. मागील महिन्यात फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. सोमवारीच भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी राज ठाकरेंची त्यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेटल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Team Global News Marathi: