भाजपच्या मिशन बारामतीला सुरुवात मंत्री निर्मला सीतारमण आज पुणे दौऱ्यावर

 

पुणे | लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. भाजपने पुणे जिल्ह्यावर सध्या लक्ष केंद्रीत केले. त्याचप्रमाणे बारामती लोकसभा मतदार संघातही भाजप आपली ताकद दाखवणार आहे. भाजपच्या मिशन बारामतीची आजपासून सुरुवात होत आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज पुणे दौऱ्यावर आहेत.

पुणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. सीतारमण यांचा या ठिकाणी तीन दिवस दौरा असेल. यावेळी अर्थमंत्री या भूमिकेतून त्या कोणत्या मोठ्या घोषणा करणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक तसेच संघटनात्मक आढावा त्या घेणार आहेत.सीतारमण यांच्या पुणे दौऱ्याच्या माध्यमातून त्यांनी मिशन बारामतीला सुरुवात केल्याचे मानले जात आहे.

बारमतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा, पवार घराण्याचा दबदबा आहे. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे. सुळे यांना शह देण्यासाठी सीतारमण यांना भाजपने मैदानात उतरविले आहे. त्यामुळे बारामती मतदार संघावर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला कोणाचा झेंडा फडकणार याबद्दलची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या बारामती दौऱ्यावर सुळे यांनी अगोदरच आपले मत मांडले होते सीतारमण यांचे मी स्वतः बारामतीत स्वागत करिन. तसेच त्या बारामतीत आल्यानंतर त्यांना मी विनंती करते की, इथल्या अनेक संस्था त्यांनी पहाव्यात. त्यांना वेळ असेल तर मी फिरून त्यांना बारामती दाखवेन,असे विधान सुळे यांनी केले होते.

Team Global News Marathi: