उत्तर प्रदेशात ५० लाख नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू’ भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांचा आरोप |

 

पुणे | सध्या संपूर्ण देशात कोरोना संसर्गाने हाहाकार मजला आहे. त्यात उत्तरप्रदेशात नदीवर तरंगणाऱ्या शवांमुळे राज्य तसेच केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती. मात्र भीम आर्मी संघटनेचे संस्थापक चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत उत्तरप्रदेश सरकारवर घणाघाती आरोप लावले होते.

उत्तर प्रदेश सरकार करोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरली असून त्यामुळे ५० लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नसून त्यांनी राजीनामा द्यावा. चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली.

उत्तर प्रदेशमधील भीम आर्मी संघटनेचे संस्थापक चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण हे पुणे दौर्‍यावर आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना उत्तर प्रदेशमधील करोना रुग्णांच्या परिस्थिती बाबत विचारले असता ते म्हणाले की, ‘उत्तर प्रदेशात मागासवर्गीयांची मते मिळवून, सत्ता मिळवली आणि उच्चवर्गीय मुख्यमंत्री तिथे बसवला असा टोला त्यांनी योगी आदित्यनाथ यांना लगावला होता.

‘कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मुख्यमंत्र्यानी आरोग्य व्यवस्थेवर काम न करता. बिहार, आसाम ,बंगाल, केरळ राज्यातील निवडणुकीमध्ये लक्ष दिले. त्या दरम्यान ५० लाख रुग्णांचे मृत्यू कोरोनामुळे झाले. मात्र सरकारकडून हे आकडे लपवण्यात आले आहे. त्यामुळे सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही असे त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: