भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार यादीतून मिथुन चक्रवर्ती गायब

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना तेथील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यात तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना आव्हान दिले आहे. त्यामुळे पश्चिम बंगालची निवडणूक अधिक रंगतदार होणार असेच चिन्ह दिसून येत आहे.

त्यात काही दिवसांपूर्वी अभिनेता मिथुन चक्रवर्ती ह्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला होता. या निवडणुकीत त्यांना मानणाऱ्या वर्गाला आकर्षित करण्यासाठी भाजपने चक्रवर्ती यांना आपल्या तंबूत प्रवेश दिला. त्यात येणाऱ्या निवडणुकीला त्यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र भाजपच्या अंतिम यादीत सुद्धा चक्रवर्ती यांना स्थान देण्यात आलेले नाही.

भाजपाने मंगळवारी जाहीर केलेली पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांची उमेदवार यादी अखेरची मानली जाते. यामध्ये १३ जणांची नावं आहेत. रासबिहारी मतदारसंघातून मिथुनदा रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु तिथे निवृत्त लेफ्टनंट जनरल सुब्रत सहा यांना तिकीट देण्यात आले आहे.

मिथुन चक्रवर्ती यांनी नुकतेच आपले मतदार कार्ड मुंबईहून कोलकात्याला ट्रान्सफर केले. त्यामुळे मिथुन चक्रवर्ती रिंगणात उतरण्याची शक्यता बळावली होती. नंदिग्राममधून ममता बॅनर्जी यांना टफ फाईद देणारे नेते सुवेंदू अधिकारी यांच्यासाठी ३० मार्चला मिथुनदा प्रचार करणार आहेत. तसेच या प्रचार फेरीत अमित शाह सुद्धा सहभागी होणार आहे.

Team Global News Marathi: