ग्लोबल न्युज :- कडुलिंबाचा उपयोग आयुर्वेदात हजारो वर्षांपासून केला जातो आहे. कडुलिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास आणि त्वचेच्या अनेक आजारावर मात करण्यास उपयोगी ठरत असतात.
कडुलिंबाच्या पानांची चव कडू असते, पण हाच गुण आपल्यासाठी खूप उपयोगी असतो. आज आपण जाणून घेणार आहोत. आयुर्वेदात कित्येक शतकांपासून कडुलिंबाच्या पाण्याने स्नान करण्याची परंपरा चालली आहे.
कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. उन्हाळ्यात कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करणे फायदेशीर मानले जाते. कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने आपल्या संपूर्ण शरीरास डिटॉक्स करण्यास मदत मिळते.
हृदयविकाराचा झटका येण्याआधी ही लक्षणे दिसतात…!
कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेच्या संबंधित अनेक समस्यांपासून आपण वाचू शकता. मुरुम आणि त्वचेच्या एलर्जी दूर राहण्यास मदत मिळते.
कोमट पाण्यात कडुलिंबाची पाने टाकून अंघोळ केल्यास त्वचेला आलेली खाज दूर होण्यास मदत होते, त्वचा निरोगी होते. कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे मुरुम, आणि काळ्या रंगाचे डाग बरे होण्यास मदत होते.
वजन वाढू द्यायचं नाही ना ? मग रात्रीच्या जेवणात हे बदल आवर्जून करा
कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीराची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. केसांतील कोंडा आणि खरुज पासून मुक्त होण्यासाठी कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करणे देखील एक चांगला उपाय आहे. हे आपले केस चमकवते
कडुलिंबाचे पाणी तुमची थकवा दूर करण्यास मदत करते. कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने डोळ्याच्या आजूबाजूला त्रासदायक असणारे बॅक्टरीया आपोआप मारले जातात.
मूळव्याधाच्या रूग्णांनी या गोष्टी टाळाव्यात,अन्यथा नुकसान होऊ शकते
चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी दोन चमचे मधामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळून चेहर्याीवरच्या गडद काळ्या डागांवर लावा. काही मिनिटे हा थर चेहर्याथवर ठेवावा आणि चेहरा थंड पाण्याने धुवावा. चेहरा तजेलदार होतो
आपल्याला आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची काही पान टाकून आंघोळ करण्याचे फायदे हि माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.