अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच आढळले ३२ कोरोना पॉझिटिव्ह

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यात वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकारच्या चिंतेत अधिक भर घालणारी आहे. त्यात आज पासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी ३२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे एकाच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामध्ये विधान भवनाचे कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधींचा सुद्धा सुमावेश आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्यापूर्वी कोरोना टेस्ट करणे बंधनकारक होते आजपासून सुरू होत असलेल्या अधिवेशनासाठी साधारणपणे ३ हजारपेक्षा जास्त कोरोना टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्यात मंत्रालय विधिमंडळ कर्मचारी तसेच पोलीस सुरक्षारक्षक प्रसारमाध्यम आमदार यांचा समावेश आहे.

आत्तापर्यंत हाती आलेल्या माहिती नुसार तीन हजार पैकी ३२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यात विधिमंडळ मंत्रालय कर्मचारी तसंच पोलीस सुरक्षारक्षक प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. ज्या आमदारांनी विधान भवनामध्ये टेस्ट केल्या होत्या त्या बहुतेक निगेटिव्ह आल्याची माहिती विधानभवन करून देण्यात आली आहे. पण बऱ्याच आमदारांनी आणि मंत्र्यांनी खाजगी लॅब मधून टेस्ट केल्या आहेत. त्यांचे रिपोर्ट अद्याप आले नाही, अशी माहिती देण्यात आलेली आहे.

Team Global News Marathi: