बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध गर्भपातांवरुन नीलम गोऱ्हे आक्रमक

 

बीड जिल्ह्यात सातत्याने मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गर्भपात होत असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत.अवैधरित्या गर्भपात प्रकरणात सहभागींवर कडक कार्यवाही आणि SOP तयार करा असे निर्देश नीलम गोऱ्हे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव, गृह विभाग यांना दिले आहेत.

बक्करवाडी ता.गेवराई जि.बीड येथे आणखी महिलेचे अवैध गर्भपात प्रकरण उघडकीस आले आहे. यात अतिरक्तस्त्रावामुळे सीता गाडे या महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेच्या मृत्यूनंतर आरोग्य विभागाकडून कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी गेवराईच्या महिला एजंटला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात पिंपळनेर ता.गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत काल डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बीडचे प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याशी चर्चा केली.

तसेच या प्रकरणी जिल्हास्तरीय समित्या स्थापन करून या घटनेची सखोल तपास करावा असे निर्देश गृह सचिवांना पत्राद्वारे दिले आहेत. त्यांनी याबाबत पत्रात म्हटले आहे की, या घटनेनंतर परळी येथील सुदाम मुंडे प्रकरणानंतर लिंगनिदान चाचणी करणारी मोठी टोळी उघड होण्याची शक्यता वाटत आहे.

तसेच या घटनेतील आरोपी नर्सने देखील आत्महत्या केली आहे त्यामुळे यास संबंधित आणखी किती व्यक्ती यांनी गायब आहेत याच तपास तात्काळ करण्याबाबत सुचविले आहे. त्या आपल्या पत्रात म्हणतात, या घटनेच्या पार्श्वभूमीवर सातत्याने बीड जिल्ह्यात अवैधरित्या घटना घडत असल्याने पुढील सूचना त्यांनी दिल्या.

Team Global News Marathi: