बॉलिवूडस्टार अभिनेता अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा आज ४८वा लग्नाचा आहे. अमिताभ बच्चन आणि जया यांच्या लव्हस्टोरी विषयी बोलायचे झाले तर, ‘जंजीर’ चित्रपटाच्या यशानंतर अमिताभ बच्चनला जयाबरोबर लंडनला जायचे होते. मात्र, जेव्हा अमिताभ यांनी हे हरिवंशराय बच्चन यांना सांगितले तेव्हा लंडनला जाण्यापूर्वी त्यांनी जयाशी लग्न करावे असे सांगितले.
यानंतर, आजच्या दिवशी म्हणजेच ३ जून १९७३ ला अमिताभ बच्चन यांनी जयाशी लग्न केले. आज त्यांच्या लग्नाचा ४८वा वाढदिवस. त्यानिमित्त अमिताभ बच्चन यांनी आज इंस्टाग्रामवर त्यांच्या लग्नाचा फोटो पोस्ट करून जया बच्चन यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच, हा फोटो पाहिल्यानंतर भूमी पेडणेकर, राहुल देव, शिल्पा शेट्टी, बिपाशा बसू, नेहा धुपिया आणि मनीष पॉल यांच्यासह अनेकांनी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, कामाविषयी बोलायचे झाले तर, अमिताभ बच्चन लवकरच आपला हिट गेम शो ‘कौन बनेगा करोडपती’ चा १३वा सीझन घेऊन येत आहे. याच बरोबर ते रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा आगामी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ मध्येही दिसणार आहे.