इतकं व्यस्त रहा की दुःख,भीती ,पश्चाताप यासाठी वेळच मिळायला नको- वाचा कसे ते

इतकं व्यस्त रहा की दुःख,भीती ,पश्चाताप यासाठी वेळच मिळायला नको– वाचा कसे ते

कु. हर्षदा नंदकुमार पिंपळे

मीरा…..दिसायला तशी अगदी नाजूक…. जणू काही जाईजुईच फूलचं…!! वाटलं त्या फुलांसारखच तिचही आयुष्य मस्त सुगंधाने दरवळत असेल. पण नाही….या मुलीच्या डोक्यावर किती ओझं आहे ते मी अगदी जवळून पाहत होते. आणि इतकच नाही तर त्या डोक्यावर असणाऱ्या ओझ्यामुळे तिच्या मनावर किती ओझं आलं असेल याचीही मला कल्पना होती.दुःखाने तिच्या आयुष्याचा डोह अगदी वाहून चाललेला होता.

एकामागून एक अशी दुःखं येतच होती. पण नेहमी तिला पाहताना माझ्याच चेहऱ्यावर एक विशिष्ट असा आनंद पसरायचा.ति इतकी दुःखात असताना , डोक्यावर मोजता न येणारं ओझं असतानाही ती खूप वेगळी भासायची.जणू काही काहीच झालेल नाही असच तिला पाहताना वाटायचं. पण तिला असं पाहताना माझ्या मनाची घालमेल अजूनच वाढायची. राहून राहून मी शेवटी तिला विचारलच……..

“अगं मीरा…डोक्यावर एवढं ओझं असताना अशी इतकी बिंधास्त कशी…??खरं सांग…तू मनात सगळं साठवून ठेवलस नं…?” यावर ती म्हणाली…”नाही अगं…असं काही नाही…. मी स्वतः इतकी ‘busy’ असते न की काही विचारूच नको…त्या ओझं..दुःख अशा गोष्टींना भेटायला मला वेळच मिळत नाही…” आणि हे ऐकून तर माझी ‘बापरे…! ‘अशीच प्रतिक्रिया होती.

आणि तिचं Busy schedule म्हणजे केवळ एक कुठल्याही प्रकारच ऑफिस वर्क किंवा फक्त घरातील नेहमीची कामं नव्हती. ती या सगळ्यासोबतच स्वतःला स्वतःच्या छंदांमध्ये व्यस्त ठेवत होती. मला वाटलं वरवर हसतेय..आतून कुढत असेल…पण नाही ओ…तिला पाहिलं की केवळ अशक्य एवढाच शब्द मला सुचायचा. आणि खरच हे सगळं अनुभवताना माझ्या डोक्यात तर प्रश्नांची सरबत्तीच चालू झाली होती.

आणि मला सारखं वाटत होतं की यार ही मुलगी अशी कशी राहू शकते…..?आपण तर आपला अर्धा वेळ दुःख… भीती यालाच देतो….तिचं आयुष्य ती अगदी Gracefully जगत होती. मला थोडं हळवं व्हायला झालं होतं आणि थोडं कौतुकही वाटत होतं.गोष्टी इतक्यावरच थांबल्या नाहीत. तर तिच्या या वागण्याने मी मात्र पुरती गोंधळून गेले होते.

आपण पण असं करू शकतो का…??सगळं विसरून केवळ स्वतःला व्यस्त ठेवू शकतो का…?? या प्रश्नांनी मनात आणि डोक्यात काहूर माजवलं होतं.

पण मित्रांनो…. या मीरेकडून मला एक वेगळीच प्रेरणा मिळाली. तर मला वाटतं की मीच काय तर तुम्ही सुद्धा व्यस्त रहायला पाहिजे.म्हणजे तुम्हालाही काही गोष्टींपासून लांब रहाता येईल. आणि व्यस्त म्हणजे काय फक्त एखाद्या कामात स्वतःला गुंतवून ठेवा असं नाही.व्यस्त म्हणजे केवळ कामात व्यस्त असा समज करून घेऊ नका.त्याव्यतिरिक्त सुद्धा काही गोष्टी आहेत ज्यामध्ये स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा.

कारण या मीरासारखच आपल्या आयुष्यातही दुःख संकट येत असतात. भीती , चूका ,पश्चाताप किंवा यांसारख्या अनेक गोष्टी आपण अनुभवत असतो.पण यांचा असा सतत विचार करणं कितपत योग्य आहे…??कितीतरी वेळ आपण यांना अगदी सहज देऊन टाकतो. आणि कदाचित म्हणूनच आपण त्यामध्येच जास्त गढून जातो.पण मग मित्रांनो… यापेक्षा आपण कामाव्यतिरीक्त उरलेला आपला वेळ स्वतःला इतर गोष्टीत व्यस्त ठेवण्यात घालवला तर……………….तर आपलही आयुष्य मीरासारखच सहज सोपं होईल.

आपण आपल्या छंदांसाठी कधी वेळ काढत नाही तर मग असा जो उरलेला वेळ आपण छंदांमध्ये घालवूया. किंवा आपल्या आवडत्या गोष्टी आहेत त्यांच्यावर जास्त ‘Focus’ करूयात.त्याने वेळ कसा जाईल कळणारही नाही. हस्तकला, चित्रकला , वाचन, लिखाण,संगीत, नृत्य, पाककला…. यांसारख्या अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये आपण स्वतःला व्यस्त ठेवू शकतो. यामुळे दुःख, भीती , पश्चाताप किंवा नैराश्य या गोष्टींचा विसर पडून मानसिक स्वास्थ्य सुधारू शकते.

सकारात्मकता निर्माण होऊन जगण्याला पोषक वातावरण तयार होण्यासाठी हा वेळ सत्कारणी घालवणं जास्त गरजेच आहे.बाहेर फिरायला आवडत असेल तर ते करा नाहीतर मग एखाद्या NGO ला वगैरे भेट देऊन मस्तपैकी व्यस्त राहू शकता.जेणेकरून बाकी गोष्टींसाठी तुम्हाला वेळच मिळणार नाही. कारण अगदी नाचताना बेभान नाचून दुःखाचा विसर सहज पडतो.म्हणून अशा ठिकाणी स्वतःला व्यस्त ठेवा. आयुष्य सहज सुंदर होईल….. तुमच्या जगण्यातही त्या मीरेसारखी एक वेगळीच ‘Grace’ दिसून येईल.

काय मग स्वतःला व्यस्त रहायला सांगताय नं……???

सभार आपलं मानसशास्त्र

ग्लोबल न्युज नेटवर्क: