“ना डरेंगे,ना झुकेंगे; Be ready for 2024!” ईडीकडून चौकशी सुरू असतानाच नवाब मलिकांचे ट्विट

 

मुंबई | महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाव मलिक यांची आज सकाळपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे.दरम्यान, ईडीने नवाब मलिक यांच्यावर केलेल्या कारवाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली असून, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनास सुरुवात केली आहे. तर ईडीकडून चौकशी सुरू असतानाच नबाव मलिक यांनी एक सूचक ट्विट केले आहे. ‘ना डरेंगे, ना झुकेंगे, Be ready for 2024! असे नवाब मलिक यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

ईडीची चौकशी सुरू असतानाच नवाब मलिक यांनी या ट्विटमधून केंद्र सरकार आणि भाजपाला इशारा दिल्याचे संकेत मिळत आहेत. केंद्र सरकारच्या आदेशाने केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणाऱ्या कारवायांना आपण घाबरणार नाही, तसेच अशा कारवायांसमोर झुकणार नाही, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपण तयार आहोत, असा बोध मलिक यांच्या या ट्विटमधून होत आहे.

दरम्यान, राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर ईडीने आज मोठी कारवाई केली आहे. आज पहाटे नवाब मलिक यांच्या निवास्थानी आलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात आणले. तिथे सकाळपासून त्यांची चौकशी सुरू आहे.

Team Global News Marathi: