सावधान ! दिवसभरात पुण्यात 1086 तर पिंपरी चिंचवड मध्ये 635 रुग्णांची नोंद; 11 मृत्यू

सावधान ! दिवसभरात पुण्यात 1086 तर पिंपरी चिंचवड मध्ये 635 रुग्णांची नोंद; 11 मृत्यू

ग्लोबल न्यूज : शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून मंगळवारी दिवसभरात 1086 रुग्णांची वाढ झाली, तर बरे झालेल्या 795 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील 321 रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या 7 हजार 20 झाली आहे.तर पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 635 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली आहे. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 119 नवीन रुग्ण सापडले.

शहरात सध्या 723 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात 6 मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 4 हजार 903 झाली आहे. यामध्ये पुण्याबाहेरील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

दिवसभरात एकूण 795 रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 98 हजार 246 झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या 2 लाख 10 हजार 169 झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या 7 हजार 20 झाली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: