बायको नांदायला येत नाही म्हूण नवरा चढला थेट महावितरणच्या टॉवरवर !

 

माहेरी गेलेल्या बायकोला नांदण्यासाठी परत आणायचे म्हणून नवऱ्याने चक्क वीज वितरण कंपनीच्या टॉवरवर चढाई केली. आणि जोपर्यंत बायको परत येत नाही तोपर्यंत टॉवर वरून खाली येणार नाही अशी अट घातली. नवरा बायकोच्या या भांडणात शेवटी जुन्नर पोलिसांच्या मध्यस्थीला यश आले आणि अखेरीस हे नवरोबा टॉवरवरून उतरते झाले. आणि बायकोसकट ,नातेवाईक परीवार व बघ्यांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला.

ही घटना जुन्नर लगतच्या पिंपळगाव सिद्धनाथ येथे घडली. तो संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी (ता. संगमनेर) येथील रहीवासी आहे. नवरोबा त्याच्या सासुरवाडीजवळच गोद्रे गावात असलेल्या या टॉवरवर हा युवक चढला होता. बायको नांदायला येत नसल्याने या नवरोबा सासुरवाडी गोद्रे गावच्या रस्त्यावर असलेल्या पिंपळगाव सिद्धनाथ येथील, १५० फुट उंच हायहॉल्टेज टॉवरवर हातात दोरी घेऊन चढून बसला.

मात्र या प्रकाराने पोलिसांच्या डोक्याला चांगलाच ताप दिला. जवळपास एक – दीड तास तो टॉवरवर बसला होता. यानंतर बघ्यांची मोठी गर्दी केली होती. जुन्नर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी त्याच्या पत्नीला घटनास्थळी आणले व त्याची समजूत काढली. त्यानंतर पती टॉवरवरून खाली उतरला.

Team Global News Marathi: