बार्शीचे सुपुत्र संतोष पाटील उंडेगावकर झाले  ‘आयएएस’! –

बार्शीचे सुपुत्र संतोष पाटील उंडेगावकर झाले  ‘आयएएस’! –

बार्शी : तालुक्यातील उंडेगाव येथील प्रशासकीय अधिकारी व सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सह सचिव पदावर असलेले संतोष पाटील उंडेगावकर यांची बढतीने ‘आयएएस‘ केडरमध्ये निवड झाली आहे. त्यांचा सनदी सेवेत  (‘आयएएस‘) समावेश झाल्याची अधिसूचना भारत सरकारने आज (गुरुवारी) जारी केली. अत्यंत कार्यक्षम, मितभाषी अधिकारी अशी त्यांची प्रतिमा आहे.

अप्पर जिल्हाधिकारी (गट-अ) संवर्गातील संतोष पाटील हे तालुक्यातील उंडेगाव येथील रहिवासी आहेत. त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून दोन वर्षे काम केले. कोणत्याही वादात न पडता कोरोना महामारीच्या काळात त्यांनी वाखाण्याजोगी कामगिरी केली.

1996 साली राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवल्यानंतर पाटील यवतमाळ ला उपजिल्हाधिकारी, ,पांढरकवडा येथे प्रांत, अकोल्याला उपजिल्हाधिकारी रोहयो, नांदेड एमआयडीसी येथे प्रादेशिक अधिकारी,म्हणून काम केले. पाटील यांना डिसेंबर 2020 रोजी राज्य सरकारने बढती दिली.

त्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेत अप्पर आयुक्त, पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त (सामान्य ) या पदावर काम केले आहे . दीड महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सह सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.  भारत सरकारने संतोष पाटील यांची बढतीने ‘आयएएस’ केडरमध्ये निवड झाल्याची अधिसूचना जारी केली.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: