इयत्ता दहावीच्या परीक्षेत बार्शी तालुक्यातील वैराग येथील तुळशीदास जाधव प्रशालेची विद्यार्थिनी शब्दश्री विकास भोसले ही तालुक्यात सर्वाधिक ९९.६०% गुण मिळवून तालुक्यात प्रथम आली आहे. तर अनुष्का आवटे ही सुलाखे हायस्कूल ची विद्यार्थीनी 98.40 % गुण मिळवून द्वितीय आली आहे.अशी माहीती गटशिक्षणाधिकारी लक्ष्मीकांत जाधव यांनी दिली.
तुळशीदास जाधव प्रशाला, वैराग,उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम प्रशालेचा शेकडा निकाल १०० % लागला आहे.
प्रथम तीन क्रमांक
१) कु.भोसले शब्दश्री विकास ९९.६०%
२)कु.मोहिते अभिलाषा मुकुंद ९९.२०%
३)कु.तांबोळी मैफिशा जाकीर ९८.६०%
विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी – ९१.
प्रथम श्रेणी -१०
द्वितीय श्रेणी – १