बारामतीत राष्ट्रवादीला मोठा धक्का! शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात सामील

 

राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून उद्धव ठाकरे गटाला अनेक नेत्यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला अशातच आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह मनसेच्या नेत्यांच्या कल शिंदे गटाकडे वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे अशातच पवार यांच बालेकिल्ला असलेल्या बारामतीमद्ये आता शिंदे गटाने जोरदार मुसंडी मारली आहे.

एकीकडे २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. यात भाजप आघाडीवर आहे. भाजपने देशातील काही विशेष मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले असून, आगामी निवडणुकीत त्या मतदारसंघात कमळ फुलवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी केंद्रीय मंत्रीही कामाला लागले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातीलही काही मतदारसंघ असून, सर्वाधिक लक्ष राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामती मतदारसंघाकडे लागले आहे. या मतदारसंघातील राष्ट्रवादीची सत्ता खालसा करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. शिंदे गटही तयारीला लागल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, यातच बारामतीमधील राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याला खिंडार पडल्याचे चित्र आहे. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या नेतृत्वात बारामती लोकसभा इंदापूर तालुका, करमाळा सोलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

Team Global News Marathi: